मध्यरात्री झालेल्या अपघातातील जखमीला तातडीने ऍम्ब्युलन्स मागवून इस्पितळात दाखल करून माजी आ. अरविंद पाटील यांनी एकाचे प्राण वाचविले आहेत.

होय, खानापूर तालुक्याचे माजी आमदार अरविंद पाटील हे काळ रात्री एक वाजण्याच्या सुमारास लोंढ्याहून खानापूरकडे येत होते. त्यावेळी होनकल क्रॉसजवळ रस्त्यात एक व्यक्ती अपघातात जखमी होऊन वेदनांनी विव्हळत पडल्याचे त्यांना दिसून आले. तातडीने अरविंद पाटील यांनी आपली कार थांबवून ऍम्ब्युलन्स बोलावून जखमी व्यक्तीला इस्पितळात दाखल करण्याची व्यवस्था केली. त्यामुळे जखमीचे प्राण वाचले.



Recent Comments