सहकारी महिलेशी असभय वर्तन करणे कर्नाटक मार्ग परिवहन मंडळाच्या एका कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. त्याच्या या चुकीमुळे त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

होय, बेळगावातील केएसआरटीसीच्या तिसऱ्या डेपोतील मेकॅनिक कर्मचारी बसवराज नरसन्नवर याला महिला सहकाऱ्याशी असभ्य वर्तन करणे अंगलट आले आहे. आपल्या विभागातील एक कर्मचारी महिला मंगळवारी सायंकाळी ड्युटी बजावून घरी जात असताना बसवराजने तिच्याशी असभ्य चाळे करण्याचा प्रयत्न केला.
त्याबाबत तिने केलेल्या तक्रारीनंतर केएसआरटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत आदेश जारी करून बसवराजचे निलंबन केले. यासंदर्भात माळमारुती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.



Recent Comments