Belagavi

आमदार अभय पाटलांचा काँग्रेसवर शाब्दिक प्रहार ….

Share

काँग्रेस वाले सत्याला काही काळ दडपू शकतात. पण, सत्याला मारणे शक्य नाही, असा शाब्दिक टोला मारत विकासाची कास धरेतोपर्यंत निःपक्षपाती सहकार्य असेल, अशी ग्वाही बेळगाव दक्षिण मतदार संघाचे आमदार अभय पाटील यांनी दिली.

महापौर आणि महापौर पदाची निवडणूक झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अभय पाटील यांनी उपरोक्त वक्तव्य केले. बेळगाव महापालिका महापौर आणि महापौर पदाचे निवडणूक होऊ नये यासाठी काँग्रेसने सर्व ते प्रयत्न केले याकरता काँग्रेसने खूपच खालची पातळी गाठली. आपल्या हिनतेचे दर्शन घडवेत राजकारण केले.

अधिकाऱ्यांवर दडपण आणत भाजपच्या दोन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द केले. मात्र त्यांच्या या बेकायदेशीर खटाटोपीना यश आले नाही. अखेर सत्याला न्यायालयात न्याय मिळाला. आम्ही देखील अर्ज केला असता तर काँग्रेसच्या तीन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द झाले असते. पण आम्ही कोणाला हा कारण विरोध करीत नाही विकास हाच आमचा अजेंडा आहे. जो विकासाची कास धरतो त्याच्यासोबत आम्ही असू. विकासासाठी नेहमीच आम्ही सहकार्य करू असे सांगताना सत्याला काही काळ दडपता येते मात्र त्याला मारता येत नाही, असा शाब्दिक टोला आमदार अभय पाटील यांनी काँग्रेसला हाणला.

यापुढे काँग्रेस सरकारने अधिकाऱ्यांवर दडपण आणून काही लुडबुड केल्यास महामंगल आरतीच करू असे ठणकावून सांगितले. भाजप नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द व्हावे यासाठी धडपडणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावू आणि त्या अधिकाऱ्यांना चांगलाच धडा शिकवू असा इशारा आमदार अभय पाटील यांनी यावेळी बोलताना दिला.

मराठी महापौर आणि कानडी उपमहापौर निवडी संदर्भात प्रसारमाध्यम आणि छेडले असता इथे कोणत्याही भाषा आणि धर्माचा विवाद नाही. सर्व समाजाला न्याय देण्याचा, त्यांना संधी देण्याचा प्रयत्न इथे केला जातोय, असेही अभय पाटील यांनी यावेळी सांगितले.

Tags: