धारवाड राष्ट्रीय महामार्गावर रंगकामासाठी वापरण्यात येत असलेल्या थीनरची वाहतूक करणाऱ्या भरधाव टँकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने , ही घटना घडली असून अनर्थ टळला आहे.
धारवाड बाहेरील राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. पलटलेल्या टँकरमध्ये रंगकाम करण्यासाठी वापरण्यात येणारे थीनर असून, पलटी झाल्याने लॉरीतील थीनर रस्त्यावर वाहून गेल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या घटनेत ट्रकचे दोन चालक जखमी झाले असून त्यांना स्थानिकांनी वाचवून उपचार केले
स्थानिकांच्या माहितीच्या आधारे धारवाड वाहतूक स्थानकाच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला.


Recent Comments