श्रीराम सेनेच्या वतीने दरवर्षी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत कार्यकर्त्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास आणि शारीरिक प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाते. यंदा हे शिबिर बागलकोट येथे आयोजित करण्यात आले असल्याचे श्रीराम सेनेचे राष्ट्रीय प्रधान सचिव गंगाधर कुलकर्णी यांनी सांगितले.
धारवाड येथे माध्यमांशी बोलताना गंगाधर कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. दरवर्षी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हे प्रशिक्षण घेतले जाते. या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते नंतर त्यांच्या जिल्हा आणि तालुक्यात श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देतात. हिंदू कार्यकर्त्यांवर सातत्याने होणाऱ्या हल्ले आणि अत्याचारांना सक्षमपणे तोंड देण्यासाठी दरवर्षी श्रीराम सेना निवडक कार्यकर्त्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास आणि शारीरिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते.
यंदाचे शिबिर बागलकोट मध्ये पार पडले असून या शिबिरामध्ये राज्यभरातून 186 जण सहभागी झाले होते. या शिबिरात कराटे, दांडपट्टा, ऑप्टिकल शस्त्रास्त्रे आणि एअरगनचे प्रशिक्षण देण्यात आले. हिंदू कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिकार करण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण दिले जाते. सहा दिवसांच्या कालावधीत हे शिबिर पार पडले असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.


Recent Comments