Dharwad

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे… हुबळी-धारवाड महानगर पालिकेची सामान्य सभा पुढे ढकलली

Share

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे हुबळी -धारवाड महापालिकेची सामान्य सभा पुढे ढकलण्यात आली आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे हुबळी – धारवाड महापालिकेची सामान्य सभा 30 डिसेंबरला होणार नाही. सदर बैठक 7 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता महापालिका सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. ईश्वर उळागड्डी यांनी दिली.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या योगदानाला नक्कीच तोड नाही. त्यांच्या निधनामुळे अनेकांनी व्यक्त केलेल्या शोकांतिकेत सहभागी होण्यासाठी महापालिकेने बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. देशासाठी तसेच आर्थिक क्षेत्रासाठी त्यांनी केलेल्या योगदानाला सलाम करताना त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे, असे महापालिका आयुक्त डॉ. उळागड्डी म्हणाले.

Tags: