2025-26 ते 2029-30 या कालावधीसाठी श्री बसवेश्वर सहकारी बँक, बेळगावचे अध्यक्ष रमेश कळसण्णावर यांची बेळगाव तालुका कृषक समाज कार्यकारी समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बेळगाव तालुका कृषक समाज कार्यकारी समितीच्या सदस्यपदी रमेश कलसण्णावर यांची निवड झाली आहे. तसेच संस्थापक विजयकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणीच्या 15 सदस्यांची एकमताने निवड करण्यात आली.

अध्यक्षपदी मोहना सी अंगडी, उपाध्यक्षपदी सी एस सुरुगीमठ, कोषाध्यक्षपदी रमेश कळसण्णावर , प्रधान सचिव म्हणून शंकर करविनकोप्प आणि जिल्हा प्रतिनिधी म्हणून शंकरगौडा पाटील यांची निवड करण्यात आली. नवीन अधिकाऱ्यांच्या निवडीला सर्व सदस्यांनी एकमताने मान्यता दिली.


Recent Comments