Belagavi

बेळगाव विद्युत रोषणाईचा झगमगाट : गांधी भारत कार्यक्रमासाठी शहरात विद्युत रोषणाई

Share

गांधी भारत कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात आकर्षक विद्युत रोषणाई व विविध कलाकृतींनी सुशोभीकरण करण्यात आले असून जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते या विद्युत रोषणाईच्या शुभारंभ करण्यात आला .

1924 मध्ये महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या 100 व्या वर्धापन दिनानिमित्त कर्नाटक सरकार आणि काँग्रेस पक्षाने गांधी भारत नावाचा अभिनव कार्यक्रम सुरू केला आहे. बेळगाव शहरात महात्मा गांधींच्या पदस्पर्श दिनानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे .

बेळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते शहरातील डॉ.बी.आर.आंबेडकर रोड, राणी चेन्नम्मा सर्कल, जेएनएमसी महाविद्यालयाजवळ आकर्षक असा विद्युत रोषणाईचे उद्घाटन आमदार आसिफ सेठ व विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. नागनूर रुद्राक्षी मठाचे श्री सिद्धराम स्वामीजी यांनी एसजी बाळेकुंद्री महाविद्यालयाजवळ दिपलंकाराचे उद्घाटन केले.

यावेळी बोलताना आमदार आसिफ सेठ म्हणाले की, बेळगाव शहरात 1924 मध्ये महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन होऊन 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस सरकार आणि काँग्रेस पक्षाकडून गांधी भारत कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. 26 आणि 27 डिसेंबरला हा कार्यक्रम होणार असून काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते बेळगावात येणार आहेत. शहरातील 30 ठिकाणे विद्युत रोषणाईने सजवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली

शहरात सर्वत्र विद्युत दिव्यांची रोषणाई, कित्तूर राणी चेन्नम्मा, क्रांतीवीर सांगोली रायण्णा, नवदुर्गा , रामायण महाभारतातील देखावे, इतर रोषणाई सर्वांना आकर्षित करत आहे. हेस्कॉमचे सहायक अभियंता मनोहर सुतार, अश्विन शिंदे, मल्लेश चौगले, दुर्गेश मेत्री, शकील मुल्ला आदींचा सहभाग होता.

Tags: