हाडे, सांधे, आणि शस्त्रक्रियेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे डॉ. सूरण्णावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आता बेळगावात सुरू झाले आहे. मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या या रुग्णालयात अत्याधुनिक उपचार पद्धतींची सुविधा उपलब्ध आहे.

हाडे, सांधे आणि मणक्याच्या समस्यांसाठी उच्च दर्जाचे उपचार आणि शस्त्रक्रिया देणारे डॉ. सूरण्णावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आता बेळगावातील अशोकनगर, धर्मनाथ चौक येथे सुरू झाले आहे. या रुग्णालयाचे उद्घाटन बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला हिप्परगी इंचिगेरी मठाचे सद्गुरू समर्थ प्रभू महाराज, सुनदोडीचे श्री अभिनव शिवानंद स्वामीजी, हडगीन मठाचे श्री मुठ्ठेश्वर स्वामीजी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या वेळी बेळगाव उत्तरचे आमदार असिफ सैत, शिगगावचे आमदार यासिर खान पठाण, बुडाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

या रुग्णालयात रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा देण्यात येत असून, रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट, खेळात झालेल्या दुखापतींवरील उपचार, गुडघा, खांदा, कंबर आणि छोटे सांधे यांसाठी आर्थोस्कोपीच्या माध्यमातून मुरलेल्या तज्ज्ञांकडून उपचार केले जातील.
डॉ. जगदीश सूरण्णावर यांनी माहिती देताना सांगितले की, आमच्या रुग्णालयात अत्याधुनिक ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया, रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट, रोबोटिक हिप रिप्लेसमेंट, आर्थोस्कोपी खांदा आणि कंबरेच्या शस्त्रक्रिया, तसेच न्यूरो पेडियाट्रिक सेवाही उपलब्ध आहेत. आमचे तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासाठी सज्ज आहेत.

कार्यक्रमात डॉ. निवेदिता सूरण्णावर, डॉ. रवी इचलकरंजी, डॉ. सौरभ हिरेमठ, डॉ. राजीव नेगंधी, संतोष कर्मासी, आनंदकुमार खाटवी, डॉ. रीमा कौल, डॉ. कार्तिक पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सूरण्णावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने अत्याधुनिक उपचार तंत्रज्ञानासह बेळगावातील रुग्णांसाठी हाडे, सांधे आणि अन्य गंभीर समस्यांसाठी सेवा देण्यास प्रारंभ केला आहे.


Recent Comments