Belagavi

भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांच्या अध्यक्षतेखाली भाजप कोअर कमिटीची बैठक

Share

भाजपा राज्याध्यक्ष बी.वाय . विजयेंद्र यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती . या बैठकीत उपस्थित राजकीय नेत्यांनी, सदनात कोणते विषय मांडले जावेत यावर चर्चा केली.

सोमवारी रात्री झालेल्या या बैठकीत गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी आणि विजयपूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ अनुपस्थित होते. मात्र, त्यांना फोनद्वारे संपर्क साधण्यात आला, आणि त्यांनी सांगितले की, ते अधिवेशनात एकत्र येऊन या संघर्षाला थांबविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

विरोधी पक्ष नेते आर. अशोक यांनी मिडियाशी बोलताना सांगितले की, बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यात विधानसभेत आणि विधानपरिषदेतील अनुदानातील भेदभाव , फक्त काँग्रेसच्या आमदारांना अनुदान वितरित करण्यावर, पूर, आरोग्य, रस्ते आणि मूलभूत सोयी-सुविधांवर चर्चा झाली आहे.

तसेच, डोंगराळ प्रदेश आणि उत्तर कर्नाटकमधील विकास, पाणी पुरवठा आणि अति भ्रष्टाचारावर सदनात आवाज उठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत विजयेंद्र, चलवादी नारायणस्वामी, आमदार आणि विधानपरिषदेचे सदस्य उपस्थित होते.

Tags: