Belagavi

जैन समाजाच्या मागण्यांना सरकारचा पाठिंबा : मंत्री हेब्बाळकर

Share

बस्तवाड येथील जैन समाज मेळाव्यात जैन समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले. बस्तवाड गावातील कर्नाटक समस्त जैन समाजाच्या मेळाव्यात जैन समाजाच्या मागण्यांबद्दल महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांनी आश्वासन दिले.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, भारतीय संविधान अत्यंत महान आहे आणि येथे प्रत्येक धर्माच्या आचारधर्मासाठी पूर्ण स्वातंत्र्य आहे. जैन समाजाच्या अल्पसंख्याक कोट्यात होणाऱ्या अन्यायाच्या बाबतीत सरकार चांगल्या प्रकारे लक्ष देईल. तसेच, जैन धर्माच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार योग्य आणि प्रभावी उपाययोजना करेल, असा विश्वास मंत्री लक्ष्मी हेबाळकऱ्यांनी दिला. तसेच, “अहिंसा परमो धर्मः” हे तत्वज्ञान इतर सर्व धर्मांसाठी आदर्श आहे. जैन धर्माची संस्कृती अत्यंत श्रेष्ठ आहे आणि जैन धर्मीय शांतप्रिय आहेत, हे त्यांनी नमूद केले.

यावेळी बोलताना उत्तम पाटील म्हणाले, जैन समाजाच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि इतर क्षेत्रांतील विकासासाठी एक स्वतंत्र जैन महामंडळ स्थापन करण्याची मागणी जैन समाजाने केली आहे. उत्तम पाटील यांनी या बाबीवर भर दिला आणि सरकारने या महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष देऊन योग्य पावले उचलावीत, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.

या कार्यक्रमात 108 राष्ट्रसंत गुणधरनंदी महाराज, देवेंद्र कीर्ती भट्टारक, भटाकलंक भट्टारक, स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक, स्वस्तिश्री लक्ष्मीसेंन, चारुकीर्ती भट्टारक यांच्यासह अनेक जैन धर्मगुरू, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, मंत्री सतीश जारकीहोळी, डॉ. डी. सुधाकर, आमदार महांतेश कौजलगी, असिफ सेठ, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी आदी उपस्थित होते.

Tags: