Belagavi

बेळगावला दुसरी राजधानी म्हणून घोषित करून प्रशासकीय कार्यालये सुवर्ण सौधमध्ये हलवा :सभापती होरट्टी याना दिले निवेदन

Share

बेळगावला दुसरी राजधानी म्हणून घोषित करून प्रशासकीय कार्यालये सुवर्ण सौध येथे स्थलांतरित करण्यात यावी असे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ते भीमप्पा गडाद यांनी विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांना दिले .

उत्तर कर्नाटक विकास मंचचे अध्यक्ष अशोक पुजारी आणि उत्तर कर्नाटक संघर्ष समितीचे अध्यक्ष भीमप्पा गडाद यांनी आज बेळगावमधील सुवर्णसौध येथे आलेले विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी यांची भेट घेऊन बेळगावला दुसरी राजधानी घोषित करण्याची मागणी केली.

राज्याची दुसरी राजधानी म्हणून आणि राज्यस्तरीय सचिव आणि संचालक स्तरावरील कार्यालये बेळगावमधील सुवर्णसौध मध्ये स्थलांतरित करून , प्रशासकीय अधिकाराचे केंद्र बनविण्याची मागणी केली. आणि सरकारच्या राजकीय इच्छाशक्तीचा हा निर्णय उत्तर कर्नाटकच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे याकडे सरकारचे लक्ष वेधण्याची विनंती केली.

या शिष्टमंडळात सेवानिवृत्त प्राचार्य प्रा. अर्जुन पंगन्नवर, दस्तगीर पैलवान, आलम नदाफ, संजय पुजारी, रियाज पटदार, सिद्धानगौडा पाटील, सिद्धप्पा शिरसंगी , दानेश हिरेमठ, सलाम बेटगेरी आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: