पायोनियर बँकेच्या निवडणुकीचा गाजावाजा आता सध्या सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी अर्ज भरण्यास प्रारंभ केला. दरम्यान मार्कंडे साखर कारखान्याचे सदस्य व कंग्राळी खुर्द ग्रामपंचायत सदस्य चेतक कांबळे यांनी देखील शुक्रवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत असली तरी चेतक कांबळे यांना युवावर्ग त्यांना पाठिंबा देण्यास सज्ज झाला आहे.
माजी जिल्हा पंचायत सदस्य कै. यल्लाप्पा कांबळे यांच्या कार्यकाळात झालेल्या कार्याचा आढावा घेता व त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून सामान्य नागरिकांना सहकार्य मिळावे यासाठीच त्यांनी परिश्रम घेतले होते. आता त्यांच्या कार्याने प्रेरीत होऊन त्यांचे चिरंजीव चेतक कांबळे यांनी देखील शुक्रवारी पायोनियर बँकेच्या अनुसूचित जातीच्या सदस्य पदासाठी अर्ज भरला आहे.( )
सध्या युवा वर्गाला उद्योग आणि व्यवसाय उपलब्ध करून कमी व्याजदरमध्ये त्यांची प्रगती करण्यासाठी एका नवतरुणला संधी देणे गरजेचे आहे. त्यामुळेच प्रगती शक्य असल्याने चेतक कांबळे यांनी भरलेला अर्ज व त्यांनाच पाठिंबा देण्याचे आवाहन भाऊराव गडकरी यांनी केले

शुक्रवारी अर्ज भरतेवेळी अनिल पोतदर यांच्या मार्गदर्शनाखाली व मराठी भाषिक युवा आघाडीचे अध्यक्ष भाऊराव गडकरी यांच्या नेतृत्वाखाली अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी महेश डुकरे, दिपू कांबळे, दास मत्यानटी, रामा निलजकर, नागेश हनुरकर, उमेश चौगुले, कोमल कांबळे, मोहन कांबळे, कंग्राळी ग्रामपंचायत सदस्य राकेश पाटील, विनायक कमार , सोमनाथ आलोजी, केदारी पाटील, पुंडलिक पाटील आधी उपस्थित होते.


Recent Comments