बेळगावात ९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्ताच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केएसआरपी विभागाचे आयजीपी संदीप पाटील यांनी बेळगावाला भेट दिली.
हिवाळी अधिवेशन काळात पोलिस बंदोबस्त कसा असावा याबाबत संदीप पाटील यांनी बेळगावातील पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. १४ वर्षांपूर्वी बेळगावचे जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिल्यानंतर बंगळुरूला बदली झालेले संदीप पाटील यांनी आपला अनुभव अधिकाऱ्यांसमोर मांडला. तसेच अधिवेशनाच्या काळातील सुरक्षा व्यवस्थेवरही चर्चा केली.

या बैठकीत पोलिस आयुक्त याडा मार्टिन मारबान्यांग, जिल्हा पोलिस अधीक्षक भीमाशंकर गुळेद, जिल्हाधिकारी रोहन जगदीश यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments