Belagavi

महांतेश नगरातील गोळीबार प्रकरणी देशी पिस्तुलासह चौघांना अटक

Share

बेळगावमधील , महांतेश नगर येथे , तरुणावर गोळ्या झाडणाऱ्या एकूण ४ आरोपींना अटक करण्यात आली असून एक देशी पिस्तुल जप्त करण्यात आल्याचे शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले, महांतेश नगर येथे प्रणीत नावाच्या तरुणावर गोळीबार करून हत्येचा प्रयत्न केल्याच्या घटनेप्रकरणी, त्याने दिलेल्या माहितीनुसार पहिला मुख्य आरोपी आणि अन्य तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांकडून पिस्तूल जप्त करण्यात आले असून तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: