Belagavi

बेशुद्धावस्थेतील वृद्ध महिलेला सामाजिक कार्यकर्त्यांची मदत

Share

मारिहाळ गावात बेशुद्धावस्थेत पडलेल्या एका वृद्ध महिलेचे यंग बेलगाम फाउंडेशन आणि श्रीराम सेना हिंदुस्थानच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी प्राण वाचविले आहेत.

बेळगाव तालुक्यातील मारिहाळ गावातील महालक्ष्मी मंदिराजवळ एकटी राहणारी वृद्ध महिला झोपडीमध्ये बेशुद्धावस्थेत सापडली. तिच्या चेहऱ्यावर सूज येऊन जखमा झाल्याचे निदर्शनात आले. अनेक दिवस तिच्या अन्नपाण्याची काळजी घेत असलेल्या गावकऱ्यांनी यंग बेळगाव फाउंडेशन आणि श्रीराम सेना हिंदुस्तानला मदतीसाठी संपर्क साधला. यावेळी या संस्थांच्या कार्यकर्त्यांनी वृद्ध महिलेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

सामाजिक कार्यकर्त्यांनी, मारिहाळ सीपीआय कल्याण शेट्टी आणि स्थानिक पोलीस कन्स्टेबल यांच्या मदतीने, तिला त्वरित बेळगाव सिव्हिल रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले. या प्रक्रियेत ग्राम पंचायतचे अध्यक्ष रुद्रप्पा, समाजसेवक अॅलन विजय मोरे, नरू नीलजकर, अवधूत तुडवेक्कर, सोणिया फ्रान्सिस, चार्ली विजय मोरे, अद्वित चव्हाण पाटील, संदीप सोमणत्ती आणि रुग्णवाहिका कर्मचारी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

 

Tags: