सर्वोदय स्वयं सेवा संघ आणि कन्नड संघटनेच्या वतीने बेळगाव दक्षिण भागातील जुन्या पी बी रोड येडियुरप्पा मार्गावरून परगावच्या बससेवा सुरु करण्यात याव्यात, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
बेळगाव दक्षिण भागातील यडियुरप्पा मार्ग, जुन्या पी.बी. रोडचे दुपदरीकरण होऊन हा रस्ता विकसित झाला आहे. मात्र, बेळगाव दक्षिण भागातील लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली असतानाही गेल्या अनेक दशकांपासून या रस्त्यावर कोणत्याही परगावी जाणाऱ्या बससेवा चालू करण्यात आलेल्या नाहीत, परिणामी या भागातील प्रवाशांना अडचणी सहन कराव्या लागत असून, दररोज प्रवास करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
यावेळी श्रीनिवास ताळूकर बोलताना म्हणाले, जुन्या पी.बी. रोडच्या लगत समृद्ध नगर, मल्लिकार्जुन नगर, ओम नगर, टीचर कॉलनी, कुंती नगर, गायत्री नगर, बणशंकरी नगर, श्री नागेंद्र स्वामी नगर आणि इतर अनेक नव्या वसाहती उभ्या राहिल्या आहेत, याठिकाणी हजारोंची लोकवस्ती आहे.

त्याशिवाय जुने बेळगाव, वडगाव, देवांग नगर, कलमेश्वर नगर, छत्रपती संभाजी नगर, मंगाई नगर, कनकदास नगर, रेनुका नगर, लक्ष्मी नगर, होसूर, खासबाग, भारत नगर, शहापूर या भागांमध्येहि मोठी लोकसंख्या आहे. येथील बस प्रवाशांना बैलहोंगल, सावदत्ती यल्लम्मा, कित्तूर, धारवाड, हुबळी, दावणगेरी, बंगळुरू यांसारख्या ठिकाणी जाण्यासाठी वळसा घालून मध्यवर्ती बसस्थानकात जावे लागते, ही मोठी अडचण आहे. त्यामुळे या भागात बससेवा सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी मल्लप्पा सोनटक्की, प्रकाश शिरोळकर, हणमंत बुचडी, आनंद लोकरी, उदय वागूकर, सिद्दप्पा सुगंधी, मंजुनाथ मोरकर, श्रीशैल ढवळी, परशुराम उपरी, बसवराज कामकरी, गुरुराज कट्टीमनी आदी उपस्थित होते.


Recent Comments