बेल्लारीतील प्रसूत महिलेच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरएलएस ग्लुकोजच्या संदर्भात, लोकायुक्त अधिकाऱ्यांनी शनिवारी बीम्स रुग्णालयाच्या आवारातील औषधी गोदामावर छापा टाकला.बेळगाव जिल्हा औषध गोदामात आरएलएस आयव्ही ग्लुकोज मोठ्या प्रमाणात साठा केल्याचे यावेळी आढळून आले

लोकायुक्त एसपी हनुमंतराय , यांच्या नेतृत्वाखालील ८ अधिकार्यांच्या टीमने येथील बिम्स रुग्णालयाच्या औषध गोदामावर शनिवारी छापा टाकला, ज्यामध्ये RLS IV ग्लुकोज बॉक्सेस आढळले. हे ग्लुकोज पी.बी.पी. संस्था पुरवठा करत होती आणि ते गोदामात मोठ्या प्रमाणावर साठवले होते.

यावरून लोकायुक्त अधिकारी आश्चर्यचकित झाले. या ग्लुकोजचे सप्लाय एप्रिल महिन्यापासून बेळगाव जिल्ह्याच्या विविध भागात सुरू होते.

लोकायुक्त अधिकार्यांनी या गोदामाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यास सुरूवात केली आहे आणि जिल्हा रुग्णालय, तालुका रुग्णालय, सामुदायिक आरोग्य केंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे यांना कधी आणि कुठे ग्लुकोज पुरवठा केला गेला याबाबत तपास सुरू आहे.


Recent Comments