Belagavi

बांगलादेश सरकारकडून श्री चिन्मय कृष्णदास प्रभुंना अटक केल्याचा विश्व हिंदू परिषदेकडून निषेध

Share

बांगलादेश सरकारने श्री चिन्मय कृष्णदास प्रभु, जे बांगलादेशमधील हिंदू समाजाला एकत्र करणारे एक प्रमुख व्यक्तिमत्व होते, त्यांना अटक केली आहे. यावर देशभरात विश्व हिंदू परिषद तर्फे निदर्शनं आयोजित केली जात आहेत. बेळगावमध्ये देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर मठाधीशांच्या उपस्थितीत निदर्शनं झाली.

बांगलादेशमध्ये हिंदूंच्या विरोधात होत असलेल्या अन्यायाचा निषेध करत, महिलांनी व कार्यकर्त्यांनी आज निदर्शने केली आणि भारत सरकारकडून हस्तक्षेप करून श्री चिन्मय कृष्णदास प्रभुंची मुक्तता करण्याची मागणी केली.

यावेळी बोलताना आंदोलकांनी सांगितले कि , बांगलादेश सरकारने श्री चिन्मय कृष्णदास प्रभुंना अटक केली असून, यामुळे हिंदू समाजावर अत्याचार होण्याचा धोका आहे. बांगलादेशमधील हिंदू एकजूट करणे, हा श्री कृष्णदास प्रभुंचा उद्देश होता, परंतु त्यांना अटक केली आहे. यामुळे सर्व हिंदूंनी एकत्र येऊन आवाज उठवणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्वरित हस्तक्षेप करून स्वामीजींची सुटका करावी अशी मागणी आंदोलकांनी केली.

बांगलादेश सरकारने श्री चिन्मय कृष्णदास प्रभुंना अटक केली आहे, हे अत्यंत निंदनीय आहे. बांगलादेशमधील हिंदूंच्या रक्षणासाठी भारतीय सरकारने त्वरित हस्तक्षेप करावा. हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशातल्या घटनांची त्वरित दखल घ्यावी अशी मागणी कृष्णा भट यांनी केली .

यावेळी मठाधीश, विश्व हिंदू परिषद कार्यकर्ते, आणि अनेक स्थानिक कार्यकर्त्यांनी आपला निषेध व्यक्त केला. महिलांनीही बांगलादेशमधील हिंदूंच्या रक्षणासाठी एकत्र येण्याची महत्त्वाची आवश्यकता असल्याचे सांगितले. एकंदरीत , बांगलादेशमध्ये हिंदू समाजाच्या रक्षणासाठी भारत सरकारने त्वरित हस्तक्षेप करावा आणि श्री चिन्मय कृष्णदास प्रभुंची मुक्तता होईल यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि हिंदू समाजाच्या अनेक प्रतिनिधींनी केली आहे.

Tags: