Belagavi

आमदार आसिफ सेठ यांनी यमनापुर येथे रस्ते विकासाच्या कामाचा केला शुभारंभ

Share

आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते बेळगाव उत्तर मतदारसंघात येणाऱ्या यमनापुरमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.

बेळगाव उत्तर मतदारसंघांतर्गत येणाऱ्या यमनापुर येथे रस्त्याच्या डांबरीकरणासाठी दोन कोटी छप्पन लाख पन्नास हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. आमदार आसिफ सेठ यांनी आज या कामकाजाचा शुभारंभ केला .

माजी नगराध्यक्ष बसप्पा चिक्कलदिन्नी, विष्णू पाटील, खाचू पाटील, महेश पाटील, परशुराम पाटील, शामराव पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: