Belagavi

बेळगाव केएसआरपी आणि पीटीएस कंग्राळी विभागाची आंतरसंघ क्रीडास्पर्धा

Share

बेळगाव के एस आर पी घटक २ आणि पीटीएस कंग्राळी घटकाच्या वतीने क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगावच्या विश्वेश्वरय्या तांत्रिक विश्वविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. बी. ए. रंगास्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडास्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी खेळ महत्त्वाचा असल्याचे सांगून त्यांनी पोलीस विभागाच्या कार्याचे कौतुक केले व सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमांडंट रमेश बोरगावे हे होते.

यावेळी पीटीएस कंग्राळी प्राचार्य के एम महादेवप्रसाद, खानापूर पीटीएस प्राचार्य अमरसिद्ध गोंधळी, सीएआर डीसीपी सिद्दानगौडा पाटील, चन्नबसव, नागेश यडाळ, अविनाश मेघण्णावर, घटक २ संघ, पीटीएस कंग्राळीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Tags: