Belagavi

एनसीसी स्थापना दिनानिमित्त सायक्लाथॉन

Share

सेंट जोसेफ हायस्कूल व 26 एनसीसी केएआर बटालियन यांच्यावतीने सायक्लाथॉनचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. एनसीसीच्या 77 व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून आयोजन केले होते. हायस्कूलच्या एनसीसी विद्यार्थिनींसह एनसीसी बटालियनने यामध्ये सहभाग घेतला.

बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास सेंट जोसेफ हायस्कूलच्या पाठीमागील गेटपासून याला प्रारंभ झाला. हायस्कूलची एनसीसी टीम सायकलीसह यामध्ये सहभागी झाली होती. ही सायकल रॅली फातिमा कॅथेड्रल चर्च, केंद्रिय विद्यालय हायस्कूल, शौर्य चौक येथून तीन किलोमीटरपर्यंत जाऊन पुन्हा कॉलेजजवळ सांगता झाली.

प्राचार्य मेरी अब्राहम, इव्हेंट सहायक अश्विनी आंबेकर, सायकल रॅलीचे नेतृत्व करणारे प्रकाश सोनवलकर, चेतन रजपूत, वीरेंद्र महाजन, मॅन्युअल डिक्रुझ, परवेज किणीकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. हायस्कूलच्या प्राचार्य, उपप्राचार्य, व्यवस्थापन सदस्य, शिक्षकवर्ग, पीटीए मेंबर्स यांनी या उपक्रमाचे कौतुक केले

Tags: