बेळगाव रेल्वे स्थानकावर बेळगाव- बेंगळुरु सुपर फास्ट ट्रेनमध्ये सीटसाठी दोन प्रवाशांमध्ये हाणामारीची घटना घडली आहे .

बेंगळुरु कडे जात असताना, ट्रेनमधील एका बोगीत सीटसाठी दोन प्रवाशांमध्ये आधी वाद झाला आणि नंतर वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले . दोन्ही प्रवाशांनी एकमेकांना अर्वाच्च शिवीगाळ केला . अन्य प्रवाशांनी या दोघांमधील भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र दोघेही ऐकले नाहीत . ते एकमेकांना खाली पडून हाणामारी करीत होते .

घटनास्थळी रेल्वे पोलिसांनी दाखल होऊन हस्तक्षेप केला त्यानंतर त्यांनी त्या दोन्ही प्रवाशांना ताब्यात घेतले . बेळगाव रेल्वे पोलिस स्टेशन हद्दीमध्ये ही घटना घडली आहे .


Recent Comments