उदय फाउंडेशनतर्फे ज्योती पदवीपूर्व महाविद्यालयात भविष्यातील शिक्षण पद्धती आणि करिअरविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
शुक्रवारी बेळगाव शहरातील ज्योती पदवीपूर्व महाविद्यालयात उदय फाउंडेशनच्या वतीने भविष्यातील शिक्षण पद्धती आणि करिअरविषयी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून सचिन पवार आणि दयानंद सागर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी आपली मूलभूत तयारी मजबूत करून शिक्षणाचा मार्ग नीट अनुसरल्यास केलेल्या
मेहनतीचे फळ निश्चितच चांगले मिळते.
यावेळी तेजस्विनी कोकितकर, रविकुमार कोकितकर, सुशांत हलाडकर, एस.एस. पाटील, निंबालकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments