Vijayapura

वक्फ विरोधात विजयपूरमधील मठाधीशांचे आंदोलन

Share

विजयपूरमध्ये वक्फ प्रकरणी आंदोलन सुरु झाले असून विविध मठाधीश आणि स्वामींनी रस्त्यावर उतरून वक्फ प्रकरणी देण्यात आलेल्या नोटिसींविरोधात संताप व्यक्त केला.

वक्फ प्रकरणी शेतकऱ्यांसह अनेक जणांना नोटीस मिळाल्याप्रकरणी या विरोधात आंदोलन करण्यात येत असून आज विजयपूरमध्ये विविध मठाच्या मठाधीशांसह स्वामीजींनी आंदोलन छेडले. दुसऱ्या टप्प्यात सुरु असलेल्या या आंदोलनात देवस्थाम, माठांना वक्फच्या नावावर देण्यात आलेल्या नोटिसींविरोधात संताप व्यक्त करून निषेध नोंदविण्यात आला.

विजयपूरमधील बसवेश्वर चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढून सदर प्रकारचा निषेध नोंदविण्यात आला. यामध्ये विजयपूरमधील विविध मठांचे मठाधीश आणि स्वामी सहभागी झाले होते. संगनबसव स्वामीजी मनुळी, मुरुगेन्द्र स्वामी, प्रभूसारंग शिवाचार्य, सिद्राम महास्वामी, गुंडकनाळ महास्वामी यांच्यासह ५० हुन अधिक स्वामी, मठाधीश सहभागी झाले होते.

कर्नाटक रयत संघ, हसीरू सेनेचे नेते अरविंद कुलकर्णी, सन्मेष नगर, भाजप नेते उमेदव कारजोळ आदींचाही या निषेध रॅलीत सहभाग होता. वक्फ बोर्ड आणि कायदा रद्द करण्याच्या मागणीच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

Tags: