अध्यात्मिक अनुभवासाठी सायकल प्रवासाने बेळगावमधील डॉक्टर्सनी काशी विश्वनाथ आणि श्री सम्मेद शिखरजी येथील देवस्थानात भेट दिली.
डॉ. पदमजीत नाडगौडा, डॉ. यतेश पुजार आणि डॉ. समीर बागेवाडी, डॉ. अम्मनगीमठ यांनी हा सायकल प्रवास केला आहे. रबकवी, बागलकोट येथून १४ ऑक्टोबरला प्रस्थान केल्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी ते काशीला पोहोचले. त्यानंतर पुढे श्री सम्मेद शिखरजीकडे प्रयाण करत 23 ऑक्टोबर रोजी तेथे पोहोचले. 10 दिवसांच्या कालावधीत त्यांनी हा प्रवास संपूर्ण एल असून दररोज अंदाजे 180-200 किमी सायकल चालवून विविध सहा राज्यांमधून त्यांनी काशी विश्वनाथ आणि श्री सम्मेद शिखरजी येथील देवस्थानात भेट दिली.
सायकल प्रवासाच्या माध्यमातून केवळ आध्यात्मिक अनुभवच नाही तर आरोग्यासाठीही एक अनोखा प्रवास घडला, मात्र यासाठी अनेक महिन्यांपूर्वीपासूनच सराव सुरु केला होता, अशी प्रतिक्रिया सायकलवरून प्रवास करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. त्यांच्या या प्रवासात आकाश होस्कोटी सहाय्यक कर्मचारी, लिंगय्या हिरेमठ आणि शहाजहान पकाली यांनीही मोलाची साथ दिली.


Recent Comments