Banglore

भाजपच्या भ्रष्टाचारावर पंतप्रधान मोदींनी कारवाई करावी : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

Share

मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, भाजप पक्षात अनेक भ्रष्ट लोक आहेत आणि पंतप्रधान मोदींनी आधी त्यांच्यावर कारवाई करावी.

म्हैसूरमध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कि , हरियाणात पंतप्रधान मोदींच्या प्रचार , भाषणात राज्याचा मुडा मुद्दा उपस्थित केला . मात्र मोदी मणिपूरमधील हिंसाचारावरही बोलले नाहीत, तिथे भेटही दिली नाही? असा सवाल त्यांनी केला.

खोट्या विधानांना प्रतिसाद देऊ नका पत्रकार परिषदेत कुमारस्वामी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, कुमारस्वामी यांची सर्व विधाने खोटी असून त्यांच्या सर्व शब्दांना उत्तर देण्याची गरज नाही.

ते म्हणाले की, पोन्नण्णा हे माझे कायदेशीर सल्लागार असल्याने मी दररोज त्यांच्याशी कायद्याबाबत चर्चा करतो.

Tags: