मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुडा घोटाळ्यावरून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा द्यावा, असा भाजपचा आग्रह आहे. तर दुसरीकडे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या मी कोणत्याही कारणास्तव राजीनामा देणार नाही , कायदेशीर लढाई सुरूच ठेवणार अशा पवित्र्यात आहेत. या प्रकारामुळे आज भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बेंगळुरू येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलनकर्त्या भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मुडा घोटाळ्यासंदर्भात राज्यपालांवरील कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दाखल केलेली रिट याचिका कर्नाटक उच्च न्यायालयात फेटाळल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी वाढली आहे. सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राज्यभरात निदर्शने करणाऱ्या भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या बेंगळुरू येथील निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला.
बेंगळुरू येथील कुमारकृपा गेस्ट हाऊसजवळ आंदोलन करणाऱ्या आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.


Recent Comments