Banglore

अत्याधुनिक जीवनरक्षक सुविधा असलेल्या ६५ रुग्णवाहिकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Share

वाहतुकीचे नियम न पाळता वाहन जे चालवतात तसेच मद्यप्राशन करून जे वाहने चालवतात त्यांचा परवाना रद्द केला केला जाईल, असा इशारा मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी दिला. आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग आणि राज्य रस्ता सुरक्षा प्राधिकरणाच्या 65 आधुनिक जीवनरक्षक रुग्णवाहिकांच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, की आम्ही 65 प्राथमिक आणि माध्यमिक रुग्णवाहिका समर्पित केल्या आहेत. अत्याधुनिक सुविधा असलेल्या रुग्णवाहिका येत्या काही दिवसांत संपूर्ण राज्यात विस्तारित करण्यात येणार आहेत. वाहतुकीचे नियम आणि शिस्त पाळली तर बहुतांश अपघात रोखता येतात.

मद्यपान करून वाहने चालविणे थांबवावे, आपल्या कुटुंबाचा विचार करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. मोबाईलवर बोलत वाहने चालवली तर अपघात होणार नाही का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी जबाबदार व्यक्ती आहात त्यामुळे वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. वाहतुकीचे नियम न पाळता वाहन चालवणाऱ्यांचा आणि मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांचा परवाना रद्द करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी परिवहन मंत्र्यांना दिल्या.

Tags: