वन नेशन वन इलेक्शनमुळे जनतेमध्ये नव्हे तर विरोधकांमध्ये संभ्रम आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार नवीन व्यवस्था हाताळण्यास सक्षम आहे, अशी प्रतिक्रिया राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी व्यक्त केली.
ते आज बेळगावात माध्यमांशी बोलत होते. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने वन नेशन वन इलेक्शनला दिलेल्या मंजुरीचे आम्ही स्वागत करतो. देशातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रसंगी निवडणुकांचे वेळापत्रक आखल्यामुळे विकास खुंटत आहे. तसेच खर्चही वाढत आहे. प्रशासकीय यंत्रणा ठप्प होत आहे. माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीने जगातील 8-10 देशांमध्ये वन नेशन वन निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी एक अहवाल दिला आहे.
वन नेशन वन इलेक्शन हा विकास पूरक असून याला विरोध करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांनी थांबवावा. नवीन प्रणालीमुळे देशात कोणताही गोंधळ होणार नाही. नव्या व्यवस्थेमुळे विरोधक संभ्रमात पडले आहेत. भाजप हे सक्षमपणे हाताळेल. पण ते कसे हाताळायचे हे विरोधकांना कळत नाही, असा टोला त्यांनी लगावला.
काश्मीर खोऱ्यातील लोकांची दिशाभूल करणाऱ्या ३ कुटुंबांनी आपल्या मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवले आहे. त्याला कलम ३७० रद्द करून काश्मीरची प्रगती हवी आहे. हे ओळखून राहुल गांधी यांनी बोलायला हवे, अशी टीका त्यांनी केली. गोकाकच्या महालक्ष्मी को-ऑप क्रेडीट बँक घोटाळ्याबाबत बोलताना ते म्हणाले की, कुणाच्या तरी एका चुकीवरून बेळगावच्या सहकार क्षेत्रावर कुणीही आरोप करू नयेत. चूक करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
भाजप आमदार मुनिरत्न नायडू यांना अटक केल्याप्रकरणी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, , राजकारण्यांनी आपले व्यक्तिमत्त्व स्वच्छ ठेवावे. मुनिरत्न यांना पुन्हा चौकशीसाठी बोलाविण्यात आले हि शोकांतिका असल्याचेही ते म्हणाले.


Recent Comments