Banglore

प्रामाणिकपणा, परिश्रम आणि पारदर्शकता हे कर्तृत्वाचे मंत्र : डॉ. के. पुरुषोत्तम राव

Share

कर्नाटक रूरल एज्युकेशनल ट्रस्ट राणी चन्नम्मा कॉलेज ऑफ फार्मसी आणि आरएमएल कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने एकता आणि कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी ‘उत्तेजन २०२४’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नाटक रूरल एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष आर.एस. मदरखंडी हे होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सरचिटणीस वृषभ नागमोती, संचालक डॉ.ए.डी. तारनळ्ळी, प्राचार्य डॉ. विजयानंद पुजेरी, विद्यार्थी प्रतिनिधी साक्षी घटकांबळे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमास बीदरच्या सीईएस कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. के. पुरुषोत्तम राव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, विद्यार्थ्यांना एखादा पुरस्कार मिळाल्यावर आनंद होईल. याचबरोबर अशा पुरस्कारामुळे प्रोत्साहन वाढेल. विद्यार्थ्यांचे यश पाहून त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांनाही आनंद व समाधान वाटेल. प्रामाणिकपणा, परिश्रम आणि पारदर्शकता हे यशाचे मंत्र असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्राचार्य डॉ. विजयानंद पुजेरी यांनी महाविद्यालयातील सुविधा कार्य आणि विद्यार्थ्यांच्या कामगिरीची माहिती दिली. कर्नाटक रुरल एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष आर.एस.मदरखंडी बोलताना म्हणाले की, पालक आपल्यासाठी करत असलेली मेहनत लक्षात घेऊन आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवून मेहनत करावी. विद्यार्थ्यांनी जबाबदारी ओळखून पालकांचा व शिक्षकांचा विश्वास जपावा. उपलब्ध असलेल्या सुविधा आणि संधींचा त्यांनी चांगला उपयोग करून घ्यावा.

यावेळी राणी चन्नम्मा कॉलेज ऑफ फार्मसी व आरएमएल कॉलेज ऑफ फार्मसीचे विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

Tags: