गदग शहरातील टांगाकूट सर्कल येथे पहाटे दोनच्या सुमारास दोन गटात हाणामारी झाली.
गणेश विसर्जन दरम्यान दोन गटात हाणामारी झाल्याची घटना गदग शहरातील टांगाकूट सर्कल येथे पहाटे दोनच्या सुमारास घडली. दंगल आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.
फटाके फोडण्याच्या मुद्द्यावरून दोन गटात वादावादी झाली. या वादाला दंगलीचे वळण लागले. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. लाठीचार्ज होताच लोक वेगवेगळ्या दिशेने धावले. ही घटना गदग शहर पोलिस ठाण्याच्या व्याप्तीत घडली


Recent Comments