Banglore

मुख्यमंत्री पदासाठी शर्यत असेल तर मी पुढे असेन : शामनूर शिवशंकरप्पा

Share

सिद्धरामय्या राज्यात चांगले प्रशासन चालवत आहेत, जर मुख्यमंत्री बदल झाला तर मी त्या जागेवर निवडणूक लढवणार आहे, असे धक्कादायक विधान काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार शामनूर शिवशंकरप्पा यांनी केले आहे.

दावणगेरे येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार शामनुर शिवशंकरप्पा म्हणाले की, राजकारणात कनिष्ठ-वरिष्ठ असा प्रश्नच येत नाही. ते म्हणाले की, आमदार ज्याला बहुमत देतील तो हायकमांडला मान्य आहे, मलाही मुख्यमंत्री व्हायचे आहे. मुख्यमंत्री बदलाचा प्रश्न असेल तर मी आधी निवडणूक लढवणार.. आता सिद्धरामय्या चांगले प्रशासन चालवत आहेत. जोपर्यंत हायकमांडचा आशीर्वाद आहे तोपर्यंत राज्य करावे, असे शामनूर म्हणाले.

शामनुर शिवशंकरप्पा म्हणाले की, काही लोक बोलत आहेत ,तसे बोलून काही फायदा नाही आणि त्याचा आपल्यावर काहीही परिणाम होणार नाही.

Tags: