चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील चिंतामणी शहरात चालकाचे टिप्पर वरील नियंत्रण सुटून हॉटेलमध्ये घुसल्याने, दोन जण ठार तर ग्राहक गंभीर जखमी झाला.
चिक्कबल्लापूर येथून खडी वाहतूक करत असताना चालकाचे अचानक टिप्परवरील नियंत्रण सुटले आणि हा टिप्पर थेट दर्शनी फास्ट फूड हॉटेलवर जाऊन धडकला .
टिप्परच्या धडकेने हॉटेलचे कॅशियर आणि स्वयंपाकी भट्ट यांचा जागीच मृत्यू झाला तर नाश्ता करणारा ग्राहक गंभीर जखमी झाला.
गैया यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या या घटनेबाबत चिंतामणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.


Recent Comments