खासदार डॉ. के. सुधाकर यांना मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी फटकारले असून कोविड काळातील कोविड अहवालात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कोविड अहवाल अद्याप मीच पाहिला नाही तर मग डॉ. सुधाकर यांच्याकडे याबद्दल माहिती कशी आली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
म्हैसूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, सरकारला कोविड दरम्यान कथित भ्रष्टाचाराचा अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र अहवालात काय आहे हे मी अद्याप पाहिलेले नाही, मग खासदार सुधाकर यांना अहवालाची माहिती कशी काय मिळू शकते? असा सवाल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला.
कोविड दरम्यान झालेल्या भ्रष्टाचाराचा तपास अहवाल न्यायमूर्ती मायकेल कुन्हा यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. याबाबतचा अहवाल त्यांनी गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून काय कारवाई करायची ते पाहू, असे सांगितले. खासदार सुधाकर चुकीचे आहेत त्यामुळेच अहवाल उघड होण्याआधीच तो खोटा असल्याचा आरोप करत आहेत. आपण काहीतरी चूक केली आहे हे त्यांच्या मनात आहे, त्यामुळेच ते असे आरोप करत आहेत हे त्यांच्या मानसिकतेवरून दिसून येत असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
म्हैसूर शहर विकास प्राधिकरणाचे माजी आयुक्त जी.टी. दिनेश कुमार यांना मी निलंबित केलेले नाही, नगरविकास विभागाने त्यांना निलंबित केले आहे. त्याला स्थगिती देण्यात आल्याची माहिती आहे. कोणते घटक लक्षात घेऊन हि कारवाई केली जाते हे माहीत नाही. मुडा भ्रष्टाचाराचा अहवाल देण्यासाठी आयोग स्थापन करण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. ()
चामुंडी बेट विकास प्राधिकरणाची पहिली बैठक चामुंडी टेकडीवर होत आहे. चामुंडी टेकडीवर गेल्यावर चामुंडी मातेचे दर्शन घ्यावे या हेतूने मी दर्शन घेतले. मुडा प्रकरणाला मी घाबरत नाही. नेहमीप्रमाणेच माझी भूमिका स्पष्ट असून भाजपवर खोटे आरोप केले नाहीत. आपल्याकडे पुरावे आहेत याची त्यांना भीती आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राजमाता प्रमोदादेवी आणि खासदार यदुवीर यांनी व्यवस्थापन मंडळाच्या सचिवांना पत्र लिहून बैठक घेणे बेकायदेशीर असल्याचे यापूर्वी व्यवस्थापन मंडळाने सांगितले होते. पूर्वी सरकार सदस्य आणि अध्यक्षांची नियुक्ती करत असे. ते सरकारच्या नियंत्रणात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अंगणवाडी सेविकांना तीन महिन्यांपासून पगार मिळत नसल्याची चर्चा होत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, अंगणवाडी सेविकांना पगार देण्यात आला असून याबाबत तपासणी केली जाईल.


Recent Comments