Banglore

बळ्ळारी कारागृहात दाखल झालेल्या दर्शनसाठी नवीन कैदी क्रमांक!

Share

बंगळुरूच्या परप्पा अग्रहार तुरुंगात खून प्रकरणातील दर्शनला शाही पाहुणचार मिळाल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याची रवानगी आज बळ्ळारी कारागृहात करण्यात आली आहे.

रेणुका स्वामी हत्येतील आरोपी दर्शन याला आज बळ्ळारी कारागृहात हलवण्यात आले आहे. परप्पा अग्रहार कारागृहात दर्शनला मिळालेल्या शाही पाहुणचाराचे प्रकरण वायरल झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून रेणुका स्वामी हत्याकांडातील अन्य काही आरोपींना दर्शनसह राज्यातील विविध कारागृहात हलवण्यात आले आहे. बळ्ळारी येथे रवानगी करण्यात आलेल्या दर्शनचा कैदी क्रमांक देखील बदलण्यात आला आहे.

यापूर्वी दर्शनचा कैदी क्रमांक ६१०६ असा होता त्यानंतर त्याच्या अनेक चाहत्यांनी वाहनावर ६१०६ क्रमांक लिहिला होता. तर काही चाहत्यांनी टॅटू देखील काढून घेतले होते. एकाने आपल्या मुलाला कैद्याची वेशभूषा करत त्याच्या कपड्यावर ६१०६ आकडा लिहिला. सोशल मीडियावर या गोष्टीचा विरोध करण्यात आला. इतकंच नव्हे तर ६१०६ नावाचा चित्रपट देखील नोंद करण्यात आला.आता दर्शनची रवानगी बळ्ळारी कारागृहात करण्यात आल्या नंतर त्याचा कैदी क्रमांकही बदलण्यात आला असून त्याला ५११ असा नवा क्रमांक देण्यात आला आहे.

यापूर्वी कोणत्याही चित्रपटात कैद्याची भूमिका करताना दर्शनचा कैदी क्रमांक १७१ असायचा. दर्शनचा लकी क्रमांक नऊ आहे आणि १७१ या आकड्यांची बेरीज केल्यास ९ येते.. त्यामुळे दर्शनने त्याच्या सर्व चित्रपटांमध्ये हाच क्रमांक वापरला होता…

परप्पा अग्रहार कारागृहातून बळ्ळारी येथे त्याची रवानगी होत असताना, बेळगाव उत्तर विभाग कारागृह केंद्राचे डीआयजी टी पी शेष यांच्या ताफयाने त्यांना कुलिंग ग्लास उपलब्ध करून दर्शनची रवानगी केली. आरोपीला सामान्य कैद्याप्रमाणे नेण्याऐवजी सहलीला नेल्याप्रमाणे वागणूक देण्यात आली याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Tags: