रस्ते देशाची समृद्धी दर्शवतात. त्यामुळे रस्त्यांचा विकास खूप महत्त्वाचा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दीर्घकाळ टिकणारे रस्ते तयार करून अपघात टाळता येऊ शकतात, असे मत के एस एच आय पी चे मुख्य प्रकल्प अधिकारी एस.एफ.पाटील यांनी व्यक्त केले. बेळगाव येथील दि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सुवर्णसौध, बेळगाव येथे रस्ता सुरक्षा अभियांत्रिकी आणि अभिनव बांधकाम तंत्रज्ञान या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
इंस्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सचे एस.वाय. कुंदरगी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात , कर्नाटक सरकार चे KSHIP चे मुख्य प्रकल्प अधिकारी, एस.एफ. पाटील, PWD, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. धारवाडचे मुख्य अभियंता एच. सुरेश उपस्थित. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सचे अध्यक्ष एम नागराज, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता मनमंथया स्वामी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे म्हणूनउपस्थित असलेले , KSHIP चे मुख्य प्रकल्प अधिकारी कर्नाटक सरकार एस.एफ.पाटील म्हणाले की, रस्ते देशाची समृद्धी दर्शवतील. त्यामुळे रस्त्यांचा विकास खूप महत्त्वाचा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दीर्घकाळ टिकणारे रस्ते बांधले पाहिजेत. त्यामुळे अपघात टाळता येतील. विद्यार्थ्यांमधून पाठ्यपुस्तकांमधून रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सचे सचिव डॉ. बी. व्यंकटेश, समन्वयक सी. बी. हिरेमठ यांच्यासह सदस्यांचा सहभाग होता.


Recent Comments