आपण पर्यावरण स्वच्छ आणि हिरवेगार ठेवण्याची गरज आहे. कुटुंब, शेजारी आणि मित्रांमध्ये या विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे. असे सर्वलोक सेवा फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष वीरेश बसैया हिरेमठ म्हणाले .
शनिवारी त्यांनी काकती पोलीस ठाणे परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण जनजागृती केली. आपण पर्यावरण रक्षणाबाबत जागरूक होऊ या. मुलांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करूया. पर्यावरणाबाबत प्रत्येकाने जनजागृती करावी, असे ते म्हणाले.

यावेळी काकती सीपीआय उमेश एम , पीएसआय मृत्युंजय मठद , मंजुनाथ हुलकुंद , प्रकाश बळाल, अनिल पावशे , बाळू मेस्त्री, बाळू कणबरकर , जयराम पाटील व कंग्राळी गणेश मंडळाचे सदस्य उपस्थित होते.


Recent Comments