मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितल्यानंतर पश्चिम बंगाल घटनेच्या धर्तीवर आंदोलन करण्याचे वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यावर राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी संताप व्यक्त केला.
काँग्रेस नेत्यांचे वक्तव्य लाजिरवाणी गोष्ट आहे, या प्रकरणी त्यांनी ताबडतोब माफी मागावी अशी मागणी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केली. आज बेळगाव मध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, राज्यसभेत सीएम सिद्धरामय्या यांच्या घोटाळ्यांविरोधात आवाज उठवला असून सीबीआय चौकशी सुरू आहे. मात्र काँग्रेस नेते त्याला वेगळाच रंग देत आहेत. दलितांच्या नावावर सत्तेत आलेल्या काँग्रेसवाल्यांनी दलितांचा पैसा लुटला, आता मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
इव्हान डिसोझा यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, जर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा मागितला गेला तर ते पश्चिम बंगालच्या धर्तीवर आंदोलन करतील असे लाजिरवाणे वक्तव्य करण्यात आले. याप्रकरणी काँग्रेस नेत्यांनी तत्काळ राज्यातील जनतेची माफी मागावी, असेही ते म्हणाले.


Recent Comments