Banglore

सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मी सदैव तयार : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

Share

सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मी आणि आमचे मंत्रिमंडळ सदैव तत्पर आहोत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी व्यक्त केली.

आज राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सहभागी होऊन ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, संत बसवेश्वर यांनी समतावादी समाजाचे स्वप्न पाहिले. त्यांची स्वप्ने साकार करण्याची जबाबदारी तुमची आहे. त्यासाठी कठोर परिश्रम घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. समतावादी समाजाच्या अपेक्षेने सरकारने राबविलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे हे तुमच्यावर अवलंबून आहे.

तुमच्या कष्टाचे सार्थक तेव्हाच होईल जेव्हा सरकारी योजना, उपक्रम शोषित समाजाच्या दारापर्यंत पोचवले जातील. त्यामुळे आपल्यासोबत मिळून निरोगी समाजाची निर्मिती करायची आहे, असे ते म्हणाले. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार ओपीएस आणि आरोग्य संजीवनी कार्यक्रमाबाबत शासन योग्य निर्णय घेईल. हे तुमचे सरकार आहे. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. सरकार आणि सरकारी कर्मचारी मिळून जनतेच्या पाठीशी राहून जनतेचे ऋण फेडू या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

यावेळी शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा, मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव गोविंदराजू, नसीर अहमद, आमदार प्रकाश राठौड, शासनाच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश, उपमुख्य सचिव एल के अतिक आणि राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या विविध विभागांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: