Banglore

मुख्यमंत्र्यांविरोधात राज्यपालांचा निर्णय अक्षम्य गुन्हा : मंत्री दिनेश गुंडूराव

Share

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात राजकीय षडयंत्र आखण्यात येत असून राज्यपालांची ही कृती अक्षम्य गुन्हा असल्याचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी सांगितले.

मंगळुरूमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव म्हणाले की राज्यपालांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास परवानगी दिली आहे. ईडी, आयटी, सीबीआय या सर्व गोष्टींचा गैरवापर झाला आहे. राज्यपालांचे कार्यालयही आता भाजपचे कार्यालय झाले आहे. राज्यपाल कोणत्या पातळीपर्यंत खाली आले आहेत हे दिसून येत असून ते भाजपच्या बाहुल्यासारखे वागत आहेत. आम्ही कायद्यासाठी लढत आहोत. असे ते म्हणाले.

लोकायुक्त संतोष हेगडे यांनी स्वत: येडियुरप्पा यांच्या विरोधात अहवाल दिला होता. पण नंतर राज्यपालांनी नीट विचार करून खटला चालवण्यास परवानगी दिली. त्या प्रकरणाची सध्याच्या प्रकरणाशी तुलना करणे शक्य नाही, असेही मंत्री दिनेश गुंडूराव यांनी स्पष्ट केले. ()

Tags: