भाजपने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या विरोधात कट रचला असून राज्यपालांकडून खटला भरून राजभवनाचा गैरवापर केला आहे, अशी टीका महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली आहे.
बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या, राज्यपालांनी घटनात्मक पदावर बसून राज्यघटना राखली पाहिजे. मात्र राज्यपाल हे भाजपचे हातचे बाहुले असून भाजपने त्यांचा गैरवापर केला आहे. ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही त्या राज्यात भाजप त्रास देत असून भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात ईडी आणि आयटीचा गैरवापर होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामे देण्याची गरज नाही असे त्या म्हणाल्या.
सरकारी पक्षाकडून खटला चालवण्यास कोणतीही अडचण नाही. या मागे राजकारण असून आम्ही कर्नाटककडून योग्य उत्तर देऊ, असे लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या. येडियुरप्पा यांच्यावर भाजपनेच ताशेरे ओढले आहेत. तीनवेळा येडियुराप्पांवर ताशेरे ओढणारे आम्ही नसून भाजपनेच त्यांना तुरुंगात टाकले अशी टीकाही लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली.
विरोधक सिध्दरामय्यांच्या राजकीय चारित्र्यावर डाग पाडण्यासाठी कट रचत असून त्यांनी आधी आपले हात कशाने माखले आहेत याची काळजी घ्यावी, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.
खटल्याच्या परवानगीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली असून आज संध्याकाळी बेंगळुरू येथे बोलाविण्यात आल्याची माहितीही लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.


Recent Comments