देवाच्या नावावर राजकारण करणाऱ्या कार्कळचे आमदार सुनील कुमार यांनी उडुपी आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यातील जनतेची फसवणूक केली आहे, असा आरोप महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आणि उडुपी जिल्ह्याच्या पालक मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला. देवाच्या, रामाच्या नावावर राजकारण करणाऱ्या सुनील कुमार यांनी हजारवेळा खोटे बोलून जनतेची दिशाभूल केली आहे. परशुरामाची मूर्ती पितळेची आहे की फायबरची आहे हे आता स्पष्ट होत असून जनतेशी खोटे बोलून प्रभुत्व मिळवल्याचा आरोप त्यांनी भाजपवर केला.
उडुपी जिल्ह्यातील जनतेने आता तरी जागे व्हावे. त्यांनी देवालाही एकटे सोडले नाही. तर माणसाला कसे सोडतील? भाजप प्रशासनाच्या गेल्या मंत्रिमंडळ बैठकीत परशुरामाची मूर्ती गोमाळात न बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मूर्तीचे काम असेच चालू रहावे हीच आमची अपेक्षा आहे. मूर्तीचे काम पूर्णत्वास नेण्याचा आमचा मानस आहे असे त्या म्हणाल्या.
बैन्दूर मधील काँग्रेस-भाजपच्या वादासंदर्भात प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, दोन वेळा आमदार झाल्याने मलाही वंचितपणा म्हणजे काय हे माहित आहे. मला सत्तेच्या साधक-बाधक गोष्टींबद्दलही पूर्ण कल्पना आहे. कोणाचा हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही, असे त्या म्हणाल्या.
अधिकाऱ्यांना बैठकीसाठी कुठे बोलवावे तिथेच बोलाविणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांना खाजगी जागेवर बैठकीसाठी बोलावणे योग्य नाही. सरकारी कार्यक्रम सरकारी कार्यालयात करणे हा एक प्रोटोकॉल आहे, अशा शब्दात त्यांनी आमदार गुरुराज गंटेहोळे यांना टोला लगावला.
बेंगळुरू येथील माणिक शाह परेड ग्राउंडवर आयोजित स्वातंत्र्य समारंभातील भाषणादरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुलेटप्रूफ व्हेस्ट काढून टाकल्याबद्दल मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी प्रतिक्रिया दिली, आमचे मुख्यमंत्री वाघासारखे आहेत. कर्नाटक हे शांतताप्रिय राज्य आहे. कर्नाटक राज्यात बुलेट प्रूफ ची गरज आहे का? सिद्धरामय्या नेहमीच खंबीर असतात. यात शंका नाही, आणि त्यामुळेच सिद्धरामय्या यांना टायगर हे नाव पडले, असे त्या म्हणाल्या.
कांचीनाडकाजवळील टोलनाक्याला विरोध झाल्याची माहिती मला मिळाली असून, चार किलोमीटरमध्ये दोन टोलनाक्यांबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. जिल्हाधिकारी, एसपी आणि इतर अधिकाऱ्यांसमवेत मी या ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार आहे. तिथे काय समस्यां आहेत त्या लक्षात घेऊन संबंधित मंत्र्याशी बोलून समस्या सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मरवंते – सोमेश्वर बीच बंदराच्या कामाला विलंब होत असल्याची बाब माझ्या निदर्शनास आली असून या संदर्भात मी ठेकेदार बिरादार यांच्याशी चर्चा केली आहे. कामाला गती देण्याचे काम करून ठराविक कालावधीत काम पूर्ण करावे, अशा सूचना देण्यात आल्याचे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.


Recent Comments