साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठान मुंबई (महाराष्ट्र) तर्फे मनीषा सन्नाईक यांना राज्यस्तरीय महिला भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
मनीषा सन्नाईक यांनी मद्रास विद्यापीठातून पदवीत्तर शिक्षण घेतल्यानंतर आपल्या सुखी संसारा बरोबरच बेळगाव येथील इन न्यूज या वृत्तवाहिनी मध्ये वृत्त निवेदिका म्हणून काम केले आहे. कालांतराने त्या के एल इ वेणू ध्वनी कम्युनिटी रेडिओ वर मराठी प्रोग्राम एज्युकेटिव्ह निवेदक म्हणून रुजू झाल्या. त्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र कर्नाटकातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखतीच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत विचार पोहोचवण्याचं काम केले.
बेळगाव ,कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांनी तळागाळापर्यंत विविध कार्यशाळा राबवल्या त्यामधून त्यांनी स्वच्छता, महिलांचे आरोग्य, मुलांची घ्यावयाची काळजी, बालसंगोपन, बचत गट यासारखे उपक्रम राबवून सामाजिक जाणीव जागृती कार्यक्रम यशस्वी केले. या त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा राज्यस्तरीय महिला भूषण पुरस्कार प्रदान देऊन गौरवण्यात आले.
टाऊन हॉल उल्हासनगर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमास मान्यवर व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments