प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या विद्यार्थीवेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी, बीम्स संस्थेच्या विद्यार्थ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले.
बीम्सच्या विद्यार्थ्यांनी आज कामबंद आंदोलन करून निषेध नोंदवला. आपल्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी आज शांततेत आंदोलन करण्यात आले.

इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटकात वैद्यकीय विद्यार्थ्यांकडून आकारले जाणारे शुल्क जास्त आहे, परंतु विद्यार्थी वेतन खूपच कमी आहे. राज्यात कनिष्ठ डॉक्टरांना सेवा सुरक्षा नाही. अनेकवेळा शासनाकडे दाद मागितली पण उपयोग झाला नाही. सरकारने आमची मागणी लवकर पूर्ण न केल्यास भव्य आंदोन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलक डॉक्टर डॉ. मंजुनाथ यांनी दिला.

यावेळी बीम्समधील अनेक प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी सहभाग घेतला होता.


Recent Comments