Belagavi

विजयपूरमध्ये वकिलाची निर्घृण हत्या; बेळगावात निदर्शने

Share

विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यात वकिलाच्या निर्घृण खून प्रकरणाचा निषेध करत बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले.

बेळगाव बार असोसिएशनने सोमवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इंडी तालुक्यातील वकिलाच्या हत्येच्या निषेधार्थ निदर्शने केली.

राज्यात वकिलांवर हल्ले वाढत आहेत. कर्नाटक सरकारने अशा घटना रोखल्या पाहिजेत. विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यात वकिलाची हत्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष बसवराज मुगळी यांनी केली.

रवी मेलिनेकेरी या वकीलाचा विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यात अपघात झाला. मात्र हा अपघात नसून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. वकिलांच्या मारेकऱ्याना कठोर शिक्षा झाली पाहिजे. याबाबत कर्नाटक सरकारकडे दाद मागणार असल्याचे बेळगाव बार असोसिएशनचे सचिव वाय.के.दिवटे यांनी सांगितले.

या आंदोलनात विजय पाटील, शीतल रामशेट्टी, विश्वनाथ सुलतानपुरी, सुमितकुमार अगसगी, इरण्णा पुजेर, विनायक निंगनूरी आदींसह अनेक वकिलांचा सहभाग होता.

Tags: