म्हैसूर पदयात्रेप्रमाणे बेल्लारी पदयात्रेची चर्चा झाली असे माजी मंत्री अरविंद लिंबावळी यांनी सांगितले . म्हैसूर चलो पदयात्रा संपल्यानंतर लगेचच राज्यातील भाजपमध्ये एक मनोरंजक घडामोडी घडल्या आहेत. पदयात्रेपासून दूर राहिलेल्या भाजप नेत्यांनी बेळगावातील खासगी रिसॉर्टमध्ये गुप्त बैठक घेतली.
एका खासगी रिसॉर्टमध्ये 10 हून अधिक नेते बैठक घेत होते. आमदार बसनगौडा पाटील यत्नाळl, रमेश जारकीहोळी, माजी खासदार जी.एम. सिद्धेश्वर, प्रताप सिंह, अण्णासाहेब जोल्ले, माजी मंत्री अरविंद लिंबावळी यांच्यासह अनेक नेते या बैठकीत सहभागी झाले होते.
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मंत्री अरविंद लिंबावळी यांनी मुडा घोटाळ्याचा निषेध केला आणि सांगितले की, ज्या प्रकारे म्हैसूर चलो पदयात्रा सुरू होती त्याप्रमाणे , वाल्मिकी घोटाळ्याचा निषेध करून , बागलकोट जिल्ह्यातील कुडलसंगम ते बेल्लारी पर्यंत पदयात्रा काढण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली . अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही आणि भाजप हायकमांड यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Recent Comments