Banglore

यादगिरी पीएसआय यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये : गृहमंत्री परमेश्वर यांची घोषणा

Share

यादगिरी पीएसआय परशुराम यांचे संशयास्पद मृत्यू प्रकरण सरकारने गांभीर्याने घेतले आहे. गृह विभाग आणि सरकारतर्फे त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख देण्याची घोषणा गृहराज्यमंत्री डॉ.जी.परमेश्वर यांनी केली आहे.

गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी यदागिरीच्या PSI परशुराम यांच्या घरी भेट देऊन शोक व्यक्त केला. कराटगी तालुक्यातील सोमनाळ गावातील मृत परशुराम यांची पत्नी आणि कुटुंबीयांची गृहमंत्र्यांनी भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांनी पीएसआय परशुराम यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल शोक व्यक्त केला. कोप्पळ जिल्ह्याचे पालक मंत्री शिवराज तंगडगी, हुबळीचे आमदार अब्बय्या प्रसाद आणि स्थानिक नेते देखील यावेळी उपस्थित होते.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गृहमंत्री डॉ.जी.परमेश्वर यांनी सांगितले कि, आमदार आणि त्यांच्या मुलावर झालेल्या आरोपासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे सोपवले. तपास सुरू आहे. कोणीही पैसे घेऊन बदली करत नाही. बदलीसाठी दोन वर्षांचा कालावधी निश्चित केला आहे.

मला विरोधकांकडून शिकण्याची गरज नाही. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आलेला नाही. सीबीआय या प्रकरणात पात्र नाही. मात्र कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काम करू. सात महिन्यात परशुरामाची बदली कशी झाली ते मला माहीत नाही. सीआयडीच्या तपासात सर्व काही उघड होईल, असे ते म्हणाले.

एफआयआर दाखल करण्यास विलंब होत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला. प्राथमिक तपासानंतर तक्रार नोंदवून त्यानंतर आरोपींना अटक केली जाते. आर. अशोक गृहमंत्री होते त्यावेळी सीआयडी चांगली होती का?असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला.

बदलीसाठी पैसे मिळाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. मात्र याची तपासणी केली जाईल. भ्रष्टाचार रोखण्यासाठी आम्ही सर्व उपाययोजना करू.  राज्यात बदलीचे रॅकेट असल्याच्या मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार रायरेड्डी यांच्या विधानाबाबत बोलताना ते म्हणाले की हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे. मी हवेत गोळी झाडत नाही. पैसे कोणाला मिळणार याचे नाव त्यांनी सांगितले तर त्याची चौकशी करू, असे ते म्हणाले.

माननीय राजपाल यांनी मुख्यमंत्र्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याबाबत आम्ही मंत्रिमंडळात चर्चा केली आहे. आम्ही राज्यपालांच्या आदेशाचे पालन केले असून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांनी कोणतीही चूक केलेली नाही. याबाबत आम्ही कायदेशीर लढ्यासाठीही तयार आहोत असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Tags: