ANIMAL

विजयपूर : खड्ड्यात पडलेल्या रानमांजराला जीवदान

Share

विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील तडवलगा गावात आढळलेल्या रानमांजरावर उपचार करून सुरक्षित स्थळी सोडण्यात आले.

तडवलगा गावातील संतोष अल्कोळ्ळी आणि बसवराज तारापूर यांनी सदर मांजराला सुखरूप बाहेर काढले. खड्ड्यात आढळलेल्या मांजराला नीट पुढे जाता येत नसल्याचे समजताच त्यांनी दुचाकीवरून तडवलगा गावातील पशुसंवर्धन रुग्णालयात आणले. रुग्णालयाचे पशुवैद्यकीय परीक्षक अशोक कागर यांनी वेळीच योग्य उपचार दिल्यानंतर रानमांजराला सुरक्षित स्थळी सोडण्यात आले.

Tags: