विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी पूरग्रस्तांना न्याय देण्यासाठी काम करावे. त्याशिवाय म्हैसूर येथील मुडा घोटाळ्याबाबत पदयात्रा काढली जात आहे, हे निषेधार्ह आहे. असे भारतीय कृषक समाजाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धगौडा मोदगी म्हणाले.

शुक्रवारी बेळगावात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या 2019 मध्ये अतिवृष्टी व पावसाअभावी शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला, मात्र आजतागायत दिलासा मिळालेला नाही. याची तातडीने पूर्तता करण्यात यावी असे ते म्हणाले. जिल्ह्यातील गाळ भरलेले कालवे साफ करून स्वच्छ करावेत. खानापूरच्या वनक्षेत्राकडे होत असलेले दुर्लक्ष निंदनीय आहे. जिल्हा प्रशासनाने तेथील लोकांच्या

हितासाठी आरोग्य केंद्रे उघडून त्यांच्यावर योग्य उपचार करावेत, अशी इच्छा त्यांनी प्रकट केली . तसेच शेतकऱ्यांना राज्य महामार्गांवर टोलमुक्त प्रवेश द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
पत्रकार परिषदेत भारतीय कृषक समाजाचे सदस्य सहभागी झाले होते.


Recent Comments